Ad Code

THE SP CREATION Success story of Shubham Patil स्वत: त्याऺच्या शब्दात

 

 THE SP CREATION Success story of Shubham Patil.                स्वत: त्याऺच्या शब्दात।

जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचे आपल्या वेबसाईटवर.


शुभम पाटिल म्हणतात..............मित्रांनो अपयश ही यशाची पहिली पायरी मानली जाते आणि हे कुठेतरी माझ्या जीवनाची निगडित आहे. मित्रांनो माझा  हा प्रवास आहे हा प्रवास सुद्धा एका अपयशाने सुरु झाला होता. आत्ता हा जो   प्रवास आहे माझ्या चैनल ला आता दोन वर्ष होऊन जास्त दिवस झाले आहेत, खरंतर हा जो प्रवास आहे तो दोन वर्षाच्या अगोदरच सुरू झालेला आहे. आता हे सर्व समजून घेण्यासाठी आपण दोन वर्ष पाठीमागे जाऊ या.

नूतन वर्ष सुरू होतं 2017चा आणि त्यावरची मी बारावी या वर्गात होतो, आणि जानेवारी ते फेब्रुवारी असे दोनच महिने होते अभ्यास करण्यासाठी,आणि माझा जो सगळ्यात कमकुवत पॉइंट होता तो म्हणजे माझा मोबाईल, कारण त्यावेळेस इतका मी मोबाईलच्या आहारी गेलेलो होतो की, अभ्यासात अजिबात लक्ष लागत नव्हतं माझं. मी मोबाईल वर फक्त फोटो एडिटिंग करत बसायचो, आणि त्यावेळी माझा मोबाईल होता इंटेक्स 3g.

आणि त्यावेळी फेसबुकची एक भयानक क्रेझ होती, आणि फेसबुक ची क्रेझ असल्यामुळे आम्हाला सर्व मित्र परिवाराला एकच सवय होती की, फोटो काढायचे आणि ते एडीट करून फेसबुक वर टाकायचे आणि जास्तीत जास्त लाइक्स मिळवायचा. आणि सुरुवातीला हेच आमच्यासमोर टार्गेट असायचं.आणि त्या वेळी आम्ही काय करायचं आमच्या मोबाईलचे कॅमेरा वगैरे चांगले नव्हते तरीही आम्ही फोटो काढायचो, आणि ते फोटो जे आहेत ते मोबाईल वर एडिट करायचं आणि फेसबुक वर टाकायचे.

आणि ह्या सगळ्या गोष्टी ते कुठेतरी अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होतं.आणि त्यानंतर मित्रांनो ज्यावेळी बारावीचा निकाल होता, आणि मला पूर्णपणे माहीत होतं की किती टक्के पडणार आहेत, कारण मला माहित होतं की पेपर आहेत ते मी कसे लिहिले आहेत. मला तर खात्री म्हणत होती की मला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क पडतील. आणि मी घरच्यांना सांगितलं होतं की मला बारावी झाल्यानंतर एक 4G मोबाइल हवा आहे. तर मला घरच्यांनी त्या वेळी आठ ते दहा हजार रुपये दिले होते. आणि ज्या दिवशी मी मोबाईल घेतला त्याच दिवशी माझा बारावीचा निकाल होता.कारण मला माहित होते जर निकाल लागल्यानंतर मी मोबाईलची मागणी केली तर माझे मार्क्स बघून ते मला कधीच मोबाईल घेऊन देणार नव्हते.


READ GOVERNMENT SCHEMES


आणि त्यानंतर निकाल पाहिला तर मला 55 टक्के एवढे मार्क्स आले होते. आणि माझ्या जीवनातला सगळ्यात कमी मार्क्स हा रिझल्ट होता.कारण मला दहावीला 73 पॉईंट वीस टक्के होते , आणि बारावीला डायरेक्ट 55% म्हणजे खूप मोठा फरक होता.

त्यानंतर मित्रांनो मी जो मोबाईल घेतला होता तो होता ओप्पो ए थर्टी सेवन, त्यानंतर मित्रांनो मी फर्स्ट इयर ला गेलो खरंतर मला घ्यायचे होते इंजीनियरिंग, परंतु काही कारणास्तव ग्रुप क्वालिफाय झाला नाही, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचा विषय डोक्यातून काढूनच टाकला. नंतर मला एक कोर्स समजला बीसीए नावाचा  म्हणजेच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ,

त्यानंतर आमची फील्ड आहे ती मी सिलेक्ट केलीआणि पहिल्यांदाच घरापासून लांब च्या कॉलेजला गेलो होतो तिथे नवीन नवीन मित्र मैत्रिणी भेटले होते. आणि त्यात मला मोबाईलचं वेडं भयानक लागलेलं होतं.आणि त्यातच माझी अभ्यास करायची सवय आहे ती मोडून गेलेली होत.

आणि ज्यावेळी जानेवारी च्या आसपास म्हणजेच जानेवारी 2018 च्या आसपास,मला समजले कि यु ट्यूब वरती सुद्धा चैनल तयार करता येते, यु ट्यूब वरती येण्याचं माझं कारण एकच होतं की जर आपण फेसबुक वर फोटो टाकून लाईक्स मिळतो तसचआपण युट्युब वर तीसुद्धा व्हिडिओ टाकूया आपल्याला थोडेफार व्हिडिओ एडीट करता येतातत्यातून लाइक्स वगैरे मिळतील आणि सबस्क्रायबर वगैरे वाढतील. त्यावेळी खरं तर असं स्क्रबर्स म्हणजे काय हे सुद्धा माहित नव्हतं फक्त फॉलोवर्स आणि फ्रेंड्स मिळतील म्हणून या उद्देशाने यूट्यूब चैनल सुरू केलं होतं. त्यानंतर मी स्टेटस अपलोड करत करत गेलो.

आणि आता त्यानंतर माझा फर्स्ट इयरचानिकाल लागला आणि अक्षरशः माझ्या पायाखालची वाळू सरकली कारण मित्रांनो पहिल्यावेळी जीवनात मी यशस्वी झालो होतो. माझे चार विषय आहेत ते मागे राहिले होते. आणि जे अपयश आहे ते माझ्या जीवनातील सगळ्यात आहे असं म्हणता येईल.कारण कुठेतरी स्कॉलर असलेला मुलगा एका काळी फेल  होतो म्हणजे त्यावेळची त्याची परिस्थिती हा फक्त तोच समजू शकतो.त्यावेळी मनातच वाटू लागले की आपण किती स्कॉलर आणि हुशार होतो आणि आता आपण वेल झालो आणि घरच्यांना कसं सांगायचं?. तरीदेखील धाडस करून मी घरी सांगितलं. तर घरच्यांची रिअक्शन सुद्धा खूप भयानक होती कारण ती सांगण्यासारखी सुद्धा नव्हती .

त्यावेळी ते म्हणाले आता काय करणार कारण शेजारी तर म्हणले असते की हा नुसता घरीच असतो कॉलेजला सुद्धा जात नाही, तर मग त्यावेळी मी म्हटलं कॉम्प्युटर टायपिंग वगैरेचे कोर्स जे आहे ते मी कम्प्लिट करतो.आणि त्यावेळी कॉम्प्युटर टायपिंग मध्ये मला कसलाच रस नव्हता फक्त लोकांना दिसण्यासाठी की मी कॉलेजला जातो मी तो कोर्स पूर्ण केला.

आणि त्यानंतर माझे पाठी मागे राहिलेले विषय होते ते मी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केले.आणि आता पुढचे सहा महिने काहीतरी करावं या उद्देशाने मी युट्यूब वरती आलेलो होतो.त्यावेळी माझे पाचशे ते सहाशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते.

मग त्यावेळी मी युट्युब ची माहिती घेत राहिलो. आणि त्यावेळी मला समजले की युट्युब कडून पैसे देखील मिळतात. नंतर मी त्याची संपूर्ण माहिती आहे ती घेतली पूर्ण सहा महिन्यांमध्ये.

आणि जानेवारी महिन्यामध्ये मी माझं चॅनेल आहे ते  Monitization साठी Apply केलं कारण त्यावेली माझे 1000 सबस्क्रिबर्स आणि 4000 तास टाईम पूर्ण झालेला होता.परंतु ते चायनल पूर्ण रिटर्न झालं कारण त्यांचा मेसेज आला होता की तुमच्या चैनल मध्ये सर्व रियुज कन्टेन्ट आहे.कर मी म्हटलं की आपण दुसऱ्याचं कोणाचं कन्टेन्ट सुद्धा हात टाकलं नाही स्वताच सगळे व्हिडिओ डिलीट केले तरी पण रियुज कन्टेन्ट असे का म्हणत असेल. त्या नंतर मला एका युट्यूबर कडून कळलं की तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्यात कॉलिटी कन्टेन्ट असलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी तुमचा स्वतःचा आवाज तरी त्यात असायला हवा.आणि जरी आवाज नसेल तरी तुम्ही काहीतरी व्हिडीओच्या माध्यमातून शिक्षण देता असं काहीतरी असायला पाहिजे .

आणि त्यावेळी कळलं की आपण हे फक्त सबस्क्रायबर साठी करतोय असं केलं तर आपल्याला कोणी ओळखणार सुद्धा नाही. जरी माझ्या शेजारी बसून कुणी माझं स्टेटस चॅनल बघत असलं तरी सुद्धा मला कोणी ओळखणार नव्हतं.कारण मी फक्त स्टेटस अपलोड करत होतो त्याची फेस व्हॅल्यू केव्हा आवाज काही सुद्धा व्हिडिओमध्ये नव्हतं.

आणि त्यावेळी एप्रिल मध्ये मी हे ठरवलं की आपण जे स्टेटस बनवतो ते आपण कसे बनवतो हे आपण लोकांना शिकवू या.आणि त्यावेळी मी माझा चैनल वरील कमुनिटी पोस्ट मध्ये एक पोल विचारला होता की तुम्हाला स्टेटस कसे बनवायचे हे शिकायला आवडेल का तर बऱ्यापैकी लोकांनी त्याला प्रतिसाद दिला होता आणि हो म्हणाले होते.

मी इथे एवढच डोक्यात ठेवलं आणि एक मे 2019 ला म्हणजेच त्याच दिवशी आपला महाराष्ट्र दिन असतो त्यादिवशी मी एस पी क्रिएशन आहा चैनल सुरू केला,आणि त्या दिवशी मी असं ठरवलं की आपल्याला यूट्यूब जेवढं नॉलेज आहे तेसुद्धा द्यायचं आणि स्टेटस एडिटिंग सुद्धा शिकवायचं. आणि त्यावेळेस मला जाणवलं की आपण जर सगळ्या कॅटेगिरी च थोडं थोडं कन्टेन्ट टाकत गेलो तर आपला चैनल जास्त काही मोठा होणार नाही.मग मी ठरवलं की आपण  एडिटिंग लाइफटाइम्स शिकू शकतो मग आपल्या चैनल वर फक्त एडिटिंग शिकवायची.कारण तेव्हा बरेच युट्युब वर असं सांगायचे की मी यूट्यूब चैनल मधून बंगला घेतला ,गाडी घेतली वगैरे, मंग माझ्या सुद्धा मनात अशी लालच द् यायची की आपण सुद्धा असं काहीतरी करू या. ते जर यूट्यूब टीप सांगतात तर मी पण यूट्यूब टिप्स सांगतो असा मी विचार केला.

परंतु नंतर मला समजलं की आपण लाईफ टाईम यूट्यूब टीप सांगू शकत नाही आपल्याला एडिटिंग चांगल्या प्रकारे येते मग आपण एडिटिंग लाईफ टाईम चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो. नंतर माझ्यासमोर एक प्रश्नाला मराठीमध्ये चैनल सुरू करायचं का हिंदी मध्ये जर हिंदी केलं तर ऑल इंडिया किंवा आदर कंट्री मध्ये सुद्धा व्हिडीओ बघतील, पण मराठी केलं तर कुठेतरी महाराष्ट्रातलेच लोक फक्त बघतील. पण नंतर मी विचार केला की त्यावेळी हिंदी एडिटिंग मध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त होतो कारण हिंदी भाषेतून एडिटिंग शिकवणारे खूप सारे युट्युबर होते.

मग मी ठरवलं की आपल्या मराठी भाषेतून एडिटिंग शिकवणार कोणीच नाही मग आपण मराठीतून एडिटिंग शिकवू या आणि यासाठी मी एक मे महाराष्ट्र दिन दिवस निवडला आणि त्या दिवशी मी माझा यूट्यूब चैनल लॉन्च केला आणि त्या दिवशी मी माझा पहिला व्हिडिओ अपलोड केला. आणि तो व्हिडिओ एडिट करण्यासाठी मला चार ते पाच तास लागले होते. कारण त्यावेळी मला काहीच सुद्धा नॉलेज नव्हते की कसं बोलायचं असते म्हणून त्या वेळी मी जेवढं मला बोलायचं होतं तेवढं मी काही पेजेस वर लिहून घेतलं होतं आणि ते मी बोलत होतो.आणि घरच्यांना याबद्दल काहीही माहिती नव्हती त्यामुळे व्हिडिओ एडिट करायच्या वेळी मी शेजारी एक बांधकाम चालू होतं कामगार संध्याकाळी जात होते आणि सकाळी लवकर येत नव्हते मी तिथेच बसून हे सर्व करत होतो.सुरुवातीला तर मला खूपच वेळ लागत होता आणि नंतर नंतर मला दहा ते वीस मिनिटे लागू लागली फक्त  रेकॉर्ड करण्यासाठी. आणि रेकॉर्डिंग झाल्यानंतर मी घरी येऊन राहिलेली एडिटिंग करायचं.

घरी आल्यानंतर मी कुठेतरी मोबाईल घेऊन बसायचं मग घरच्या मला वाटायचं की हा खूपच मोबाईलच्या आहारी गेलेला आहे, आणि मी हे सांगू देखील शकत नव्हतो की मी युट्यूब वरील हे असे काही करतोय म्हणून.आणि मी हे ठरवलं की कॉलेज कट सुद्धा तेवढेच लक्ष द्यायचं आणि युट्युब कडून सुद्धा. आणि नंतर मी व्हिडिओ अपलोड करत करत गेलो. अचानक एका दिवशी माझ्या आईला समजले की हा व्हिडिओ वगैरे अपलोड करतोय. आणि नंतर मी सगळं समजून सांगितलं की मी अभ्यास सुद्धा तितकाच करेल आणि युट्युब सुद्धा तितकेच.मग त्यावेळी माझी आई म्हणाली होती की काही पण कर पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस.

अरे सुरुवातीला मी दररोज व्हिडिओ अपलोड करत नव्हतो मी एका दिवशी कन्सेप्ट बनवायचं एका दिवशी व्हिडिओ अपलोड करायचं. नंतर मी तीन ते चार महिने रेग्युलर व्हिडिओ टाकत गेलो. आणि त्यानंतर ऑगस्ट 31 रोजी माझ्या आईचे निधन झाले.आणि त्यानंतर दोन ते तीन महिने मी खूप डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो मी कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ अपलोड केला नाही. आणि मी मोबाईल ला देखील हात लावत नव्हतो.कारण या गोष्टीचा कधी विचार केला नव्हता ती गोष्ट घडली होती. नंतर मी स्वतःलाच म्हटलं की आता आपल्याला यातून सावरलं पाहिजे.

पण त्यावेळी असंच कुठेतरी म्हण जायचं की आपण हे युट्युब सोडून द्यावं. फक्त स्टडी वरतीच फोकस करावा. तरीदेखील मी यूट्यूब चालू ठेवलं. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये मी काय मास्टर एडिटिंग व्हिडिओ टाकले आणि त्यातलाच एक व्हिडीओ माझ्या एक हजार पेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडीओ बघितला.

आणि नंतर मी 19 फेब्रुवारी ला शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चे व्हिडिओ बनवत गेलो.आणि त्यावेळी फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात कॉलेजला पूर्णपणे सुट्ट्या आल्या कारण त्यावेळी को को कोवीडची सात सुरू झाली होती.नंतर आम्ही ठरवलं की आपल्याला आता जो काही वेळ भेटला आहे त्याचा पूर्णपणे आपण फायदा घ्यायचा.

कारण या अगोदर माझा टाईम टेबल असा असायचा की सकाळी लवकर उठायचं आणि घरची सगळी काम आवरून सात वाजता बसने कॉलेजला जायचं आणि आठ वाजेपर्यंत कॉलेजला पोहोचायचं. आणि आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत कॉलेज असायचं आणि अकरा वाजता परत घरी यायचं. आणि घरी येण्यासाठी बारा ते एक वाजत होते. आणि एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत मी कन्सेप्ट रेडी करायचो.आणि त्यानंतर व्हिडिओ एडिट वगैरे करून संध्याकाळी सहा वाजता मी व्हिडिओ अपलोड करायचं हा माझा रोजचा दिवसाचा टाईम टेबल झाला होता.आणि त्यानंतर मी काय मास्टर एडिटिंग वरचा एक व्हिडिओ बनवला होता जॉकी आजवर कोणीच बनवला नव्हता तो व्हिडिओ जून-जुलैमध्ये खूपच व्हायरल झाला त्यावेळी माझ्या फक्त पंधराशे ते सोळाशे सबस्क्रायबर होते.आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी यूट्यूब चैनल ओपन करून बघितलं तर अचानक माझे चारशे ते पाचशे सबस्क्रायबर वाढलेले होते. मग मी बघितलं की आपला कुठलातरी व्हिडिओ व्हायरल झालायआणि त्या व्हिडिओला एकाच दिवशी 20000 व्ह्यूज आलेले होते आणि माझा चैनल खूप चांगला पोस्ट झाला होता.

त्यानंतर मी युनिक कन्टेन्ट बनवत गेलो आणि माझा चैनल सुद्धा मोनेटाइज झाला आणि मित्रांनो आता तुमच्या सर्वांचा प्रेमामुळे आपल्या चॅनेलवर तीन लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत.[समाप्त]


मित्रांनो जर तुम्हाला या सक्सेस स्टोरी चा भाग 2 हवा असेल तर मला कमेंट करून कळवा मी तो नक्की उपलब्ध करून देईल.


धन्यवाद🙏एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ

close